priyanka ghodke profile
priyanka ghodke
95 7 0
Posts Followers Following
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - अपेक्षा?
यामुळेच निम्मे आयुष्य
वाया गेल्यासारखे वाटते... 

काव्य प्रिया... 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - मला काय वाटत सांगू का?

नशिबात सुख मंदिरात मिळणार्‍या
प्रसादासारखं असते, 
प्रसाद जेवढा वाटणीला येतो
तेवढाच मिळतो....

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - आपले कोणीच नाही
याच अविर्भावात 
कधीतरी 
जगावे लागते...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - कधीतरी सुखाला ही
नजर लागते...
तेव्हा मात्र वाट पाहण्याशिवाय
हातात काही नसते...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - नशिबाने वेळ आणली
पुन्हा एकदा माझ्यावर...
एकटेपणाचे राज्य आले 
पुन्हा एकदा माझ्यावर... 

कस असत ना, समोरचा समजूतदार 
असला की, गृहीत धरले जाते... 
चूक झाली तरी समजून घेतले जाईल 
हेच मनात पक्क केलेले असते... 

झाली असेल अनवधानाने चूक 
म्हणून शिक्षा भोगावी लागते... 
अबोल्या पेक्षा भयंकर शिक्षा मात्र 
खरच कोणतीच नसते... 

ज्या व्यक्तीची सवय असते त्याने 
मात्र अशी मस्करी करू नये वाटते... 
जरी केली मस्करी तर तेव्हा मात्र 
आयुष्य निस्तेज वाटू लागते... 

काव्य प्रिया... 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - कोजागिरीचा चंद्र आणि तुझी सोबत
म्हणजे दुग्ध शर्करा योगच जणू...
एकमेकांच्या सहवासात चंद्राच्या साक्षीने
आपल्या प्रेमाला बहार आणू...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - परतीचा पाऊस तुझी आठवण
मनात साठवून जातोय...
तुझ्याच आठवणीत जगायला
बघ ना कस सांगतोय...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - बाप्पा तुझ्या मूर्तीच विसर्जन केल जात
 तू कायम आमच्या सोबत आहे...
तुझा आशिर्वाद पाठीशी आहे म्हणून तर
आम्ही संकटांवर मात करून पुढे जातो आहे... 

काव्य प्रिया... 
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - कोणीच नाही माझ याची 
प्रत्येक वेळी जाणीव करून देतात...
एकटी होते आणि एकटी राहणार
हेच खात्रीने पटवून देतात...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - कदाचित चंद्रालाही आज माझे
 एकटेपण जाणवले असावे... 
म्हणूनच माझी सोबत करायला 
असे त्याने खिडकीतून अवचित यावे... 

काव्य प्रिया... 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - मला तुझी प्रत्येक क्षणी
साथ हवी आहे...
तुझ्या सहवासात शेवटचा 
श्वास घ्यायचा आहे...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - माहित नाही आपली साथ
कुठपर्यंत असेल...
मात्र जेव्हा तुला माझी गरज
असेल तेव्हा मीच तुझ्या सोबत असेल...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - आजही तुला पाहिल की,माझ्या 
काळजाचा ठोका चुकतो...
ह्या आयुष्यात सहवास लाभला 
नसला तरी काळजाचा ठाव तूच घेतो... 

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - नशिबाने पुन्हा एकदा
आणून ठेवले एकटेपणात...
कोणालाच माझी कीव येणार
नाही का ह्या आयुष्यात...

क्षणभंगुर आहे आयुष्य हे
तरीही असे एकटीच मी...
ना सोबती ना आधार आहे
कोणाला देऊ जिवाची हमी...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
7 likes 2 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझ्याच भेटीची आस आहे मनी 
तुलाच पाहण्या डोळे तरसले...
त्या क्षणांची आठवण जपण्यासाठी 
लेखनातील शब्द ही आतुरले...

काव्य प्रिया.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - कधी माझ्या मनाची घालमेल
तुला समजणारच नाही का ? 
तुझ्याचसाठी जीव झुरतो माझा
ह्या आयुष्यात तरी ते उमजेल का ? 

माझ्या सहनशीलतेचा अंत पाहत 
आला आहेस तू नेहमी... 
मी ही बोलून दाखवणारं नाही काही 
याची आज देते तुला हमी... 

तू जरी मान्य केले नाही तरी माझ्या 
हृदयात तुझे कायम स्थान राहील... 
तू कधीतरी माझ्याकडे परत येशील 
याच दिवसाची वाट मी पाहिल... 

तू जितका जिद्दी आहेस तेवढी मीही 
आहे हे तुला माहीतच आहे, हो ना... 
अपूर्ण आहे मी तुझ्याशिवाय मला 
भेटायला कधीतरी तू येशील ना... 

प्रिया.... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - पहिली भेट कधी न
विसरणारी असते...
कायम लक्षात राहील 
अशी अनमोल ठेवा असते...

त्या भेटीत झालेली नजरा
नजर मनाला घायाळ करते... 
नकळत झालेला अलवार 
स्पर्श अंगावर शहारे आणते... 

काही क्षणांची पहिली भेट 
आठवणीत जपल्या जाते... 
एकांतात आठवण येता ती 
भेट डोळ्यात अश्रू आणते... 

दुराव्याची भीती मनाला 
हुरहुर लावून जाते... 
पुन्हा पुन्हा भेटीची नकळत 
आस लावून जाते... 

काव्य प्रिया...

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 1 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - माझ्या देशातील माती
प्रत्येक कर्तव्य निभावते...
ती जगवते ही आणि शेवटही
तिच्याच उदरात करते...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - गेलेले ते दिवस परत
कधीच येत नाहीत...
त्या आठवणी मात्र कायम
मनात घर करून राहतात...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - समुद्र किनार्‍यावर तुझ्या सवे
एकांतात बसायला आवडेल...
त्या खळखळनार्या लाटांवर हातात
हात घेऊन चालायला आवडेल...

काव्य प्रिया.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments

Explore more quotes

priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - व्यक्त व्हावे मुक्तछंदात तू
भुलवून टाकावे शब्दात तू...
त्या गहिऱ्या अर्थात असे खूप काही
काळजाचा ठाव घ्यावा मुक्तछंदाने तू...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तू तिथे मी हे समीकरण
कधीच चुकणार नाही...
तुझ्याशिवाय आयुष्याला
काहीच अर्थ उरणार नाही...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - पाहते तुला क्षणोक्षणी 

तू माझा चंद्र मी तुझी चांदणी
पाहते रे तुला क्षणोक्षणी...
समजेल का तुला,मी तुझ्याच
आठवणींचा ठेवा जपलाय मनी...

जरी होत असतील रुसवे 
फुगवे आपल्यात...
बांधलो गेलोय आपण
प्रेमाच्या बंधनात...

माझ्यावरच्या हक्काचा दावेदार
फक्त तूच असावा...
तुझ्या माझ्यात अबोला मात्र
कधीच नसावा...

वेळ प्रसंगी समजून घेऊ
एकमेकांना...
करमत नाही हे माहीत आहे
एकमेकांशिवाय दोघांना...

काव्य प्रिया...
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - माझ्या आसुसलेल्या जिवाला तुझ्या
अलवार स्पर्शाने शांत केले...
तुझ्या प्रेमाच्या ओलाव्याने माझ
मन नकळत चिंब चिंब झाले...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझ्या प्रेमाच्या पिंजर्‍यात
अडकायला आवडेल मला...
आयुष्यात तुझ्या शिवाय मुक्त
व्हायचे नाही मला... 

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - चांदण्यांचा बहर आणि त्यात
तुझी सोबत असायला हवी... 
चांदण्यांच्या शीतलतेत तुझी प्रेमाची
मिठी मनाला शांत करायला हवी...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझ्या गोड गोड स्वभावाने 
माझ्या मनाला भावला तू...
तुझ्या चांगुलपणाने मला 
खरतर वेड प्रेमाचे लावले तू... 

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - कितीही राग आला तरी,मन
 मात्र तुझ्यातच गुरफटत असत...
कितीही रुसून दूर राहण्याचा प्रयत्न
केला तरी ते तुझ्याकडेच ओढ घेत...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - हल्ली मन माझे
कुठेच लागेना...
सोबत होती लेखणी
मात्र शब्दच सुचेना...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - वाटते मलाही, तुझ्यासवे 
पावसात चिंब चिंब भिजावे...
तुझ्या उबदार मिठीत स्वतः ला
अलवार सामावून घ्यावे... 

काव्य प्रिया.. - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - पावसाच्या चाहुलीने आज
मन माझे शांत झाले...
त्याच्या अलवार स्पर्शाने
मनावरचे घाव लुप्त झाले...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - शब्दांनी शब्दांना भुरळ घालणं बरं 
मनातील मनाचं नातं असतं खरं.....
शब्दांतून जाणिवांची होत असते ओळख, 
दोघांचा ऋणानुबंध अतूट असतो हेच खरं...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
3 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - माझा काय निष्पाप गुन्हा झाला
ते तरी एकदा सांग ना कान्हा...
नको ना असा रुसू माझ्यावर मी 
करणार नाही परत कसलाच गुन्हा...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझ्या हृदयापर्यंत पोहचण्यासाठी येणार्‍या प्रत्येक वळणावरून मला पार व्हायचे आहे...
'फक्त तुझ्या ह्रदयात'
एक माझे स्थान निर्माण करण्यासाठी...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - मुक्तछंद 

बघना किती दुर्मिळ आहे आपल नात.....
अस नात लाखात एखाद बगायला भेटत....
आपल नात जणू अस आहे जसे समुद्राच्या लाटांचे 
आणि किनाऱ्याचे जस असत ना तस आहे...
आपल नात एकमेकांच्या एवढ्या जवळ असून
आयुष्यभर समुद्राच्या लाटा किनाऱ्याच्या मिठीत
सामावण्याचा प्रयत्न करतात.
पण शेवटी निसर्गाच्या समोर अपयशच पदरी 
पडत त्यांच्या.... किनारा सुधा आयुष्यभर स्वतः च्या 
मिठीत समुद्राला सामावून घेण्याचा 
प्रयत्न करतो पण अपयशीच ठरतो......
तसच तर आहे ना आपले नाते....
एवढ एकमेकांच्या जवळ असून सुध्दा या समाजामुळे 
तुला मी माझ्या प्रेमाचा सहवास नाही देऊ शकत....
तुला सुद्धा याच परीस्थितीतून जाव लागत आहे 
याची मला जाणीव आहे...
तरी तुझ्यासाठीच माझ प्रेम तेवढेच दुर्मिळ राहिल 
जेवढ समुद्राच्या लाटांच आणि त्याच्या 
किनार्‍याच आहे....
काळजी नको करुस आपल प्रेम कायम स्वरुपी
राहील....तू माझाच आहेस मी तूझीच राहील...
      
                                      काव्य प्रिया... 

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - उंच माझा झोका जाईल
मी मुक्त भरारी घेईल...
पक्ष्यांसारखे स्वछंद बागडताना
मी सार काही विसरून जाईल...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - माझ्या मनातलं वादळ उठलेले
कोणाला कधीच दिसणार नाही... 
आयुष्यात येणार्‍या अडचणी मी
एकटीच नेहमी सहन करत राही... 

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - मनातलं ओळखता आलं तर
आयुष्य खूप सोप होऊन जाईल...
🥲🤗

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुटणाऱ्या धाग्यासारख नात नाही 

आज काल बोलण होत
नाही जास्त आपले...
तरी तुटणाऱ्या धाग्यासारख
नात नाही आपले...

मला वेळ नसेल तर 
तू समजुन घेतो...
वेळेचं गणित तू मात्र
कधीतरी मांडतो...

बोलण नसेल तर आठवण
मात्र सारखीच येते...
तुझ्याशिवाय जगणं मला
मुश्किल होऊन जाते...

मला वाटलं तूही माझी
आठवण काढत आशील...
पण काय माहित तू जुन्या
आठवणीत ही रमत अशील... 

काव्य प्रिया...
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - आपल्याला टाईम असेल तेव्हा
कुठे ट्रॅव्हल करायला जमते...
टाईम ट्रॅव्हलचा मेळ घालून प्रवास 
करताना वेळेची खरी किंमत कळते...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes

priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - दुराव्यातही खूप प्रेम आहे
यात तिळ मात्र शंका नाही...
माझ्याही मनात फक्त तूच
आहेस हेच सांगते तुला ही... 

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
1 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझ्या आठवणीत आवडत मला
चंद्राशी हितगुज करायला...
आपल्या प्रेमाच्या खास गोष्टी
त्याला हळुवार सांगायला...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - सहवास

मला वाटे प्रत्येक क्षणी
लाभावा सहवास तुझा...
तुझ्याच आठवणीत सख्या
जीव रे झुरतोय माझा...

बघ डोळेही तुला पाहण्या 
आतुर झाले कसे... 
सांगू कशी तुला रात्रंदिवस
स्वप्नातही तूच दिसे... 

तुझ्या कवेत येण्यासाठी 
आसुसला वेडा जीव माझा... 
क्षणात मोहरून टाकतो अलवार 
झालेला स्पर्श तुझा... 

या वेड्या मनाला आस फक्त 
तुझ्या एका भेटीची... 
कसे सांगू तुला सख्या! चाहूल 
लागली मनाला त्या क्षणाची... 

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - भाव भक्ती सुधाकरी अभंग
हे रघुनंदना
परम पुरुषा
हे पुरुषोत्तमा
कौशल्येया||

फळाला यावी रे
भक्ती ही माझी रे
चरणी तुझ्या रे
दाशरथी||

राम नाम घेता
धरे मन ठेका
सांग तू नायका
सुर्यवंशा||

कसे मी होऊ
शांत मनी राहू
काहूर थांबवू
कसे मी रे||

           मनाला शांतता       
तुझे नाम घेता
नष्ट होते चिंता
श्री रामा रे

   काव्य प्रिया..

 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझी साथ अशीच कायम 
मिळत राहो मला...
आयुष्यात एकमेव आनंद
देणारा तूच आहेस मला...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तुझ्या प्रेमात रंगून गेले
मी माझी न राहिले...
तुझ्या सहवासाने रंग माझा
वेगळा मी अनुभवू लागले...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - सकाळ गोड होते तुझ्या आठवणीत
माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्या सोबत...
आणि काय हव तुझ्या प्रियाला, तुझ्या
असल्यानेच ती खुश आहे ह्या आयुष्यात...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - प्रेमाच वचन

आज व्यक्त करतेय पुन्हा
तुझ्याबद्दलचे मनातले भाव...
प्रेमाचे वचन देत घेतेय मी
तुझ्या मनाचा ठाव...

तुझीच साथ द्यायचा माझा 
अट्टाहास आहे आजही...
शेवट पर्यंत तुझ्यावरच प्रेम
करणार, यात बदल होणे नाही...

तुझ्या प्रत्येक सुख दुःखात
मी तुझ्या सोबत राहील...
आज देते वचन तुला मी
कायम तुझी सावली बनून राहील...

होतील रुसवे फुगवे त्यातून 
पण एकमेकांना समजून घेऊ...
एका विश्वासाने कायम दोघं
आनंदाने एकत्र राहू...

काव्य प्रिया...
 - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - मी एकटी असताना स्वतः साठी
जगते, स्वतःलाच खुश ठेवते...
दुसर्‍यांकडून अपेक्षाभंग करून
घेण्यापेक्षा एकटीनेच आनंदी राहते...

काव्य प्रिया... - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments
priyanka ghodke
Quote by priyanka ghodke - तू माझ्या आयुष्यात येशील अशी अपेक्षा 
करणे म्हणजे जणू मृगजळ वाटते मला... 
तुझे माझे प्रेम क्षितिजापलीकडे बहरेल 
अशी अपेक्षा केल्यावर त्रास होतो मनाला...

काव्य प्रिया...  - Made using Quotes Creator App, Post Maker App
0 likes 0 comments

Explore more quotes